Monday, June 27, 2016

"दाभोलकरांना दिसलेलं भूत "

काल दिनांक २६ जून २०१६ रोजी सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध पुणे विभागाचा पहिला व्यावसायिक प्रयोग पार झाला. ऋषिकेश तुराई लिखित आणि अनिकेत सिंगम दिग्दर्शित "दाभोलकरांना दिसलेलं भूत " ह्या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे झाला. उत्तम अभिनय , उत्तम संगीत आणि प्रेक्षकांची उत्तम प्रकारे लाभलेली टाळ्यांची साथ आणि दाद हेच खूप काही बोलून गेलं. संपूर्ण टीम ला आणि त्यांना सहकार्य करणारे निर्माते आनंद चोपडे यांना अभिनंदन !!! ‪#‎natyagandhpune‬



Sunday, May 22, 2016

दाभोळकरांना दिसलेले भूत

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत.     
         नाट्यगंध, पुणे  सादर करीत आहोत 

दाभोळकरांना दिसलेले भूत

लेखक: ऋषीकेष तुराई
दिग्दर्शक: अनिकेत सिंगम

२६ जून | दुपारी १:०० वाजता ( दोन नाटक )

भरत नाट्य मंदिर, पुणे.


तिकीट संपर्क:
फोन बुकिंग -9049576530


दिनांक २६ जून २०१६ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांनी ज्यांचे पुरोगामी विचार आपल्या आयुष्यभराच्या प्रवासात धरून ठेवले ते लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या जयंती निमित्त दुपारी १ वाजता सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध पुणे विभागाचा पहिला नाट्य प्रयोग "दाभोळकरांना दिसलेले भूत " ह्या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिर , सदाशिव पेठ , पुणे येथे होणार आहे. तर सर्व प्रेक्षकांनी नक्की ह्याची पाहा.

Monday, May 9, 2016

नाट्यगंध शुभारंभ

नमस्कार
उद्या १० मे २०१६ . सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाची सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झाले. मला कधी वाटल नव्हत इतका छान प्रतिसाद मिळेल, प्रवास खडतर झाला तरी कमी दिवसात बराच चांगला - वाईट अनुभव देवून सुद्धा आज टिकून राहिलो. हि अत्यंत महत्वाची गोष्ट कुठला विचार न करता उचलेल नाट्यगंध विभाग सुरु करण्याच पूल फक्त मुंबई पुरत मर्यादित न ठेवत पुणे पर्यंत पोहचल व योग्य दिशेने प्रवास त्याचा सुरु आहेतच. मुळात नाट्यगंध हि माझ्यासाठी एक नाट्य चळवळ आहे. हौशी नाट्य कलाकारांना रंगमंचा पर्यंत पोहचविण्याची. प्रत्येक शहरात तेथेल स्थानिक हौशी कलाकारांना रंगमंचाचा अनुभव कसा देत येईल व मागे हरवत चाललेली रंगभूमी ची संस्कृती कशी पुढे वाढवता येईल. हा स्वार्थी उद्देश माझा ह्या मागे लपला आहे . माझ्या उद्देशात कोणाच कुठल्या हि प्रकारे नुकसान न करता हा उपक्रम मी  जिवंत असे पर्यंत चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल . माझ्या ह्या उपक्रमाला किती आणि कोणाचे हातभार लाभेल माहित नाही पण हा गदा नक्की पुढे नेहण्याचा प्रयत्न मी करेल . ह्या संपूर्ण वर्षभराच्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली अशा माझ्या सर्व सम्यक कलांश च्या व नाट्यगंध विभागातील कलाकारांचे चे आभार व ह्या नाट्यगंध शुभारंभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा । "आताशी सुरुवात फक्त झाली आहे, फक्त यशाचा डंका वाजवायचा आहे " तुम्ही सर्वांनी सहकार्य केल म्हणून एवढा प्रवास गाठता आला . असाच सहकार्य मिळो  हीच रंग देवता व नटेश्वारास प्रार्थना .

आपला
शशांक



Friday, May 6, 2016

P. puppets workshop in pune

सम्यक कलांश प्रतिष्ठान चे एक पाऊल पुढे . मुंबई नंतर पुणे शहरात पहिल्यांदाच मोफत कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा आयोजित करत आहोत. हि कार्यशाळा लहान मुलांसाठी आयोजित केली असून एक दिवसीय कार्यशाळा आहे . पुणेकरांनी नक्की ह्या नव्या उपक्रमाचा लाभ घ्यावा .

Friday, January 22, 2016

पुणे नाट्यगंध विभाग

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्य विभाग नाट्यगंध ह्याची दुसरी शाखा पुणे येथे सुरु करण्यात आली आहे . तरुण हौशी नाट्य कलाकारांसाठी  सुरु केलेला उपक्रम मुंबईत यशस्वी झाल्या नंतर पुणे येथे सुरु केला आहे . बऱ्याच हौशी नाट्य कलाकारांना महाविद्यालय प्रवास नंतर पुढील प्रवाससाठी व्यासपीठ सहज मिळत नाही . त्या हौशी नाट्य कलाकारांसाठी नाट्यगंध हा नाट्य विभाग सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत सुरु केला आहे . पुण्यात सुरु झालेल्या हा उपक्रमास पुण्यातील कलाकार सांभाळत आहे . जर पुण्यात राहणाऱ्या हौशी तरुण कलाकारास ह्यात सहभागी व्हायचे असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास नाट्य गंध च्या ब्लोग वर भेट द्यावी. www.natyagandha.blogspot.com

पुणे येथे सहभागी होणाऱ्या तरुण हौशी कलाकारांनी खालील नंबर वर संपर्क साधावा .
अनिकेत सिंघम - ७२७६१७२२७०
आशिष तिखे - ८०८७८९३००८

Monday, January 18, 2016

नाट्यगंध पुणे विभाग




नमस्कार ,
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या विभागाची एक शाखा पुणे येथे सुरु केली असून तेथील जबाबदारी अनिकेत शिंघम , आशिष तिखे  , शिवराज माने व तुषार लोंबते ह्या कलाकार मंडळी कडे आहे .

- शशांक किसन बामनोलकर
(संचालक - नाट्यगंध )